Home »International »Other Country» ICELANDIC GIRL FIGHTS FOR RIGHT TO HER OWN NAME

नावासाठी 15 वर्षीय युवतीची न्यायालयात धाव

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 02:52 AM IST

  • नावासाठी 15 वर्षीय युवतीची न्यायालयात धाव

रेक्याविक - नावात काय आहे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो; परंतु नावातच सर्व काही आहे, असे म्हणत त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारीही अनेक जण दाखवतात. आइसलँडमधील एका 15 वर्षीय युवतीवर मात्र स्वत:च्या नावासाठी न्यायालयात धाव घेऊन संघर्ष करण्याची वेळ आली आहे. आईने ठेवलेले तिचे नाव देशाच्या नियमाप्रमाणे नसल्याचा आक्षेप सरकारने घेतला आहे.

आइसलँडमध्ये देशातील मुलामुलींना कोणती नावे द्यायची याचे एक सरकारी रजिस्टर आहे. त्यात नोंद असलेली नावेच मुलांना द्यावी लागतात. येथील एका आईने तिच्या मुलीचे नाव ‘ब्लाएर’ असे ठेवले. आइसलँडमध्ये याचा अर्थ ‘मंद बयार’ असा होतो. परंतु अडचण अशी आहे की, या नावाची नोंद आइसलँडच्या सरकारी रजिस्टरमध्ये नाही. त्यामुळे हे नाव मुलीला देता येणार नाही, असा अधिका-यांचा आक्षेप आहे. याबाबत ब्लाएरची आई ब्योर्क एड्सडोटीर हिने सांगितले की, ‘मला रजिस्टरची काही माहिती नाही. मला एवढेच माहीत आहे की, 1973 मध्ये ब्लाएर नावाला विशेष समितीने मंजुरी दिली होती. पण आता त्याला का नकार दिला जात आहे हे आपल्याला समजत नाही.’आइसलँडमध्ये नावाचे सरकारी रजिस्टर आहे. त्यातील नावांनाच फक्त कायदेशीर मान्यता आहे. त्या यादीतून निवडून तुम्हाला ती नावे पाल्यांना देता येतात. यात मुलांसाठी 1712, तर मुलींची 1853 नावे आहेत. याचा उच्चार व व्याकरण आइसलँड भाषेनुसार आहे. याशिवाय जर पाल्याला दुसरे नाव द्यायचे झाले तर त्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो. हा अर्ज विशेष समितीकडे विचारार्थ जातो. या समितीने परवानगी दिली तीच नावे मुलांना देता येतात.

पूर्ण पानभर जाहिरात : आपल्या 13 व्या वाढदिवसानिमित्त ब्लाएरने स्थानिक दैनिकांत पूर्ण पानभर जाहिरात दिली. त्यात तिने म्हटले की, 1 फेब्रुवारी 2006 पासून मी माझे नाव ‘करवर थोरोडन’ असे करत आहे. माझे मित्र व सहकारी याचा सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. नाव ठेवल्याचा कायदा समजला जातो. तो लोकांना ‘डॉग पू’सारखी नावे देण्यापासून वाचवतो. परंतु हेही आश्चर्यकारक आहे की, ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे आपले नाव बदलता येत नाही.

अशी आहे अडचण - सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये ब्लाएर नावासमोर ‘स्तुल्का’ म्हणजे ‘मुलगी’ असे लिहिण्यात आले आहे. आइसलँडमध्ये हे नाव पुरुषवचनी समजले जाते. त्यामुळे ब्लाएरची अडचण झाली आहे. ती ज्या ठिकाणी जाईल तेथे तिला नावाचे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. बँक कार्यालय, पासपोर्ट व इतर कार्यालयांत आपण मुलगा नसून मुलगी आहोत, असे तिला सांगावे लागते.

Next Article

Recommended