आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If Marrian Not Sending , Relation Spoiled : Italian Priminister Mont

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खलाशी पाठवले नसते तर संबंध बिघडले असते : इ‍ट‍ा‍लियन पंतप्रधान माँटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - भारतीय मच्छीमारांच्या हत्ये प्रकरणात आरोपी दोन खलाशांना वापस पाठवले नसते तर भारतासोबतचे संबंध बिघडले असते. त्यामुळे आमच्यासमोर पर्याय नव्हता. जगात वेगळे पडण्याचाही धोका होता, अशी कबुली इटलीचे पंतप्रधान मारियो माँटी यांनी दिली आहे.


बुधवारी रात्री संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर बोलताना माँटी यांनी ही भूमिका व्यक्त केली. राजनैतिक संकटाचा परिणाम विकसनशील देशासोबतच्या व्यापारी संबंधावर देखील होण्याची भीती होती. खलाशांना भारतात पाठवल्यामुळे उभय देशांतील संबंध सुधारले आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हा निर्णय पूर्णपणे आर्थिक हित लक्षात घेऊन घेण्यात आल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. खलाशांचे प्रकरण वीवीआयपी हेलिकॉप्टर सौद्याशी संबंधित असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यावर माँटी यांनी हे स्पष्टीकरण दिले.