आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Murdered Mushraff Then Get 2 Crores, 200 Acre Farm, Bugti's Son Giving Reward

मुशर्रफांची हत्या केल्यास 2 कोटी, 200 एकर शेती,बुग्ती यांच्या मुलाकडून इनामाची रक्कम दुप्पट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांची हत्या करणा-यास 2 कोटी रुपये व 200 एकर शेती इनाम देण्याचे बलुच नेते अकबर बुग्ती यांच्या मुलाने जाहीर केले आहे.अकबर बुग्ती सन 2006 मध्ये एका लष्करी मोहिमेत मारले गेले होते. या प्रकरणात मुशर्रफ हे एक आरोपी आहेत. बुग्ती यांचा चौथा मुलगा तलाल बुग्ती याने यापूर्वीही मुशर्रफांच्या हत्येसाठी इनाम जाहीर केले होते. तलाल हे जहुरी वतन पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सन 2010 मध्ये मुशर्रफ यांची हत्या करणा-यास 1 कोटी रुपये आणि 100 एकर जमीन इनाम दिली जाईल, अशी घोषणा केली होती. सन 2012 मध्ये बुग्ती यांच्या नातवानेही मुशर्रफांच्या शिरावर 10.1 कोटींचे इनाम जाहीर केले आहे. बुग्ती हत्येप्रकरणी मुशर्रफ यांच्यावर खटला सुरू असून सध्या ते जामीनावर आहेत.
मुशर्रफांच्या बचावासाठी
वकिलांचा ताफा
परवेझ मुशर्रफ यांच्या राष्‍ट्रद्रोहाच्या खटल्यासाठी आठ वकिलांचा ताफा सज्ज झाला आहे. नवाझ शरीफ सरकारने मुशर्रफांविरुद्ध हा खटला दाखल केला असून आठ वकील त्यांची न्यायालयात बाजू मांडतील. मुशर्रफ यांच्या वकिलांच्या ताफ्यात शरीफुद्दीन पिरजादे, खलीद रांझा, इलयास सिद्दिकी, अहमद रझा कसुरी, इब्राहिम सत्ती, अन्वर मन्सूर आणि वकार राणा यांचा समावेश आहे.