आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Igypt Demands Bollywood Movie Want To Learn Hindi

बॉलीवूडमुळे इजिप्तमध्ये हिंदीची भुरळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो- बॉलीवूडचे हिंदी चित्रपट आता जगभर चांगला व्यवसायच करीत नाहीत, तर हिंदी भाषेचा प्रसार करण्यातही महत्त्वाची भूमिका आपसूकच बजावत आहेत. इजिप्तमध्येही हिंदी चित्रपटांचे अनेक चाहते असून या प्रेमापोटीच तेथील तीस विद्यार्थ्यांनी हिंदी-उर्दू शिकण्यासाठी कंबर कसली आहे.
कैरो येथील मौलाना आझाद भारतीय संस्कृती केंद्रात हे विद्यार्थी हिंदी-उर्दूचा अभ्यास करीत आहेत. यातील माइ मुहम्मद या विद्यार्थिनीने सांगितले की, तिला बॉलीवूडचे हिंदी चित्रपट खूप आवडतात. या चित्रपटांमुळेच ती हिंदी भाषेच्या प्रेमात पडली असून या भाषेवर प्रभुत्व मिळवल्यास भारतात नोकरी मिळवायला काही अडचण येणार नाही, असे तिला वाटते. तहरीर चौकाजवळ कैरो शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या केंद्रात भारतीय भाषा शिकणार्‍या इजिप्शियन विद्यार्थ्यांसाठी नुकतेच एका इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 25 वर्षांच्या नादियाने या केंद्रात हिंदी शिकायला सुरुवात केली आणि नंतर त्यात उर्दूचाही समावेश केला. ती म्हणाली की, भारत हा जगातील अत्यंत महत्त्वाचा देश असून तेथील भाषा इजिप्तमध्ये पर्यायी विषय म्हणून शिकवायला हव्यात. भविष्यात हे काम करायला मला आवडेल, असेही तिने सांगितले.
अल-अजहर विद्यापीठातील 60 विद्यार्थी आणि इजिप्त-भारत मैत्री संघटनेचे सदस्यही इफ्तार पार्टीत उपस्थित होते. दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त कैरोतील भारतीय दूतावासाने या प्रसंगी ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
द.आफ्रिकेत हिंदी प्रसार; पं. वेदालंकार यांचा पुतळा
जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेत हिंदीचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणार्‍या पंडित नरदेवजी वेदालंकार यांचा कांस्य पुतळा भारतातर्फे उभारला जाणार आहे. पुढील महिन्यात जागतिक हिंदी परिषद जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आली असून, या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी वेदालंकार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. 1947 पासून वेदालंकार यांनी दक्षिण आफ्रिकेत हिंदीच्या प्रसारासाठी अनेक उपक्रम राबवले. 1951 पासून त्यांनी प्रारंभ केलेला हिंदी महोत्सव आजतागायत सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी शिक्षा संघ आणि भारताच्या वतीने जागतिक हिंदी परिषद होणार आहे.