आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल कायदा कमांडर बेलमोख्तर याचा मालीमध्ये खात्मा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्डजामेना- मालीमधील अल कायदाचा कमांडर मोख्तर बेलमोख्तरला चाडच्या जवानांनी शनिवारी ठार केले. अल्जेरिया गॅस प्रकल्पावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला बेलमोख्तर उत्तर आफ्रिका शाखेचा प्रमुख होता. चाड लष्कराचे प्रवक्ते जनरल जचरिया गोबोन्क्यू यांनी ही माहिती दिली. बेलमोख्तर याच्याशिवाय अन्य अतिरेकी ठार झाले असल्याची माहिती गोबोन्क्यू यांनी दिली. त्याआधी शुक्रवारी चाडचे राष्‍ट्राध्यक्ष इद्रिस देबी यांनी लष्करी हल्ल्यात अल कायदा कमांडर अदेलहमीर अबू जईदचा खात्मा झाल्याचे सांगितले होते. जईदव्यतिरिक्त 40 अन्य अतिरेक्यांना ठार करण्यात आले. मारलेला अतिरेकी अबू जईद आहे की बेलमोख्तर हे स्पष्ट होऊ शकले नसल्याचे फ्रान्सच्या अधिकाºयांनी म्हटले आहे. अमेरिकी प्रशासनाने बेलमोख्तरबाबतच्या वृत्ताला दुजोरा देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.