आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IMF Warns Of Debate On 2010 Reform Plan Without U.S.

अमेरिकेला आडमुठेपणा सोडण्याचा इशारा;आयएमएफ प्रकरणी जी-20 राष्ट्रांचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - चालू वर्षाच्या अखेरपर्यंत जर अमेरिकेने आपला आडमुठेपणा सोडला नाही तर त्याच्याशिवायच पुढील निर्णय घेतले जातील, असा इशारा विकसनशील देशांच्या जी-20 समूहाने अमेरिकेला दिला आहे. वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या जागतिक बँकेच्या बैठकीमध्ये जी-20 राष्ट्रांचे अर्थमंत्री व केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांनी हा इशारा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कोश (आयएमएफ) च्या मतदान अधिकाराशी संबंधित असलेल्या या प्रकरणात अमेरिकेच्या आडमुठेपणामुळे भारतासह अन्य ब्रिक्स देशांना आयएमएफच्या मतदान अधिकारांपासून वंचित राहावे लागत आहे.

..तर भारतही मतदान करू शकेल
ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री हिक्की यांनी सांगितले की, अमेरिकेने आडमुठेपणा सोडून दिल्यास विकसनशील देशांच्या ब्रिक्स समूहातील सदस्य असलेले राष्ट्रसुद्धा मतदान अधिकाराचा अवलंब करू शकतील. ब्रिक्स राष्ट्रांमध्ये भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.

स्वाक्षरी करण्यास अमेरिकेचा नकार : आयएमएफला कर्ज देण्याचे अधिकार वाढवून देण्याबाबत 2010 मध्ये सर्वांनी सहमती दाखवल्यानंतरही अमेरिकेने घटनादुरुस्ती प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने या वर्षी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही तर आयएमएफला 2010 च्या करारानुसार त्यांचे निर्णय घेण्याचे अपील केले जाईल, असे जी-20 समूहातर्फे सांगण्यात आले आहे.