आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Immediately Stop Big Brother, Russia Warned America

दादागिरी तत्काळ बंद करा, रशियाचा अमेरिकेला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: युक्रेनमधील रशियन समर्थक बंडखोरांनी चालवलेल्या मोहिमेत देशभर प्रचंड नुकसान होत आहे. रॉकेट व बॉम्बवर्षावामुळे रस्त्यांची अशी वाताहत झाली आहे.
मॉस्को/ किव्ह - युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया आणि पाश्चिमात्य देशांतील तणाव वाढला आहे. रशियाने अमेरिकेला इशारा देत जगावर दादागिरी करणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. रशियाचे १५०० सैनिक क्षेपणास्त्रे व ३०० अन्य शस्त्रे घेऊन पूर्व युक्रेनमध्ये घुसले असल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे. यामध्ये १७० ट्रक आणि रणगाड्यांचा समावेश आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इजिप्तच्या दौ-यापूर्वी पाश्चिमात्य देशांवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, सोव्हिएत संघातून विभक्त झालेल्या देशांना नाटोमध्ये समाविष्ट केल जाणार नसल्याचे आश्वासन अमेरिकेने दिले होते. मात्र, अमेरिका त्याविरोधात काम करत आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या कारवाईचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांना दिला होता. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यासंदर्भात सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची भेट घेणार आहेत. मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी शुक्रवारी पुतीन यांची भेट घेतली आहे. मर्केल, पुतीन, ओलांद आणि युक्रेनचे नेते बुधवारी मिंस्कमध्ये चर्चा करण्याची शक्यता आहे.
चकमकीत नऊ युक्रेनी सैनिक ठार
पूर्वी युक्रेनमध्ये देवल्तसेव्ह भागानजीक सरकारचे सैनिक आणि रशिया समर्थक बंडखोरांमध्ये चकमक उडाली आहे. यामध्ये युक्रेनचे नऊ सैनिक ठार, तर २६ जखमी झाले. विघटनवाद्यांनी १०० वेळेस हल्ले चढवले आहेत. हे शहर रेल्वेचे मुख्य केंद्र आहे. दोनेत्स्कमध्ये एका केमिकल प्लांटमध्ये सोमवारी भीषण स्फोट झाला. फुटीरतावाद्यांनी त्यास लष्करी हल्ला ठरवले आहे. पूर्व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत ५,३०० नागरिक मारले गेले असून १० लाख निर्वासित झाले आहेत.
युक्रेनला शस्त्रे पुरवण्याचा प्रस्ताव
युक्रेनमधील सरकारला शस्त्रे पुरविण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या विचाराधीन आहे. मात्र जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचा प्रस्तावाला विरोध आहे. पूर्व युक्रेनमध्ये सरकारविरोधात रशियावादी बंडखोर लढत आहेत.
५४०० हून अधिक लोकांचा मृत्यू
युक्रेनमधील संघर्षांत गेल्या दहा महिन्यांच्या काळात ५,४०० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. सुमारे १५ लाख नागरिक विस्थापित झाले असून संयुक्त राष्ट्रसंघानेही याची गंभीर दखल घेतली आहे.