आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Falls Off Stage At Lahore Rally Sustains Serious Injuries

PHOTOS: मान हलवू शकत नाहीत इम्रान खान, बेडवरूनच देत आहेत भाषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहौर- माजी क्रिकेटर आणि पाकि‍स्‍तानमधील तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान मंगळवारी सायंकाळी एका सभेतील स्टेजवरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना तेव्हा घडली जेव्हा इम्रान मंचावर भाषण देण्यासाठी चढत होते. लिफ्ट कोसळल्याने ते सुमारे 15 फूट ऊंचीवरून थेट जमिनीवर पडले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत खान यांची पत्नी जेमिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्‍थि‍र आहे. तसेच लोकांशी ते बोलत आहेत. रूग्णालयातूनच इम्रान यांनी आपल्या समर्थकांसाठी एका व्हिडिओद्वारे संदेश पाठवला असून, आपला पक्ष पीटीआयला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


इम्रान यांच्या डोक्याला लोखंडी ग्रिलमुळे मोठी जखम झाली आहे. मानेच्या खालच्या बाजूसही मुका मार लागला आहे. काल रात्री त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाला होता. तसेच तो जागीच बेशुद्ध पडले होते. त्यांच्या खांद्यालाही जखम झाली आहे. मानेला मार लागल्याने त्यांची मान हालत नाही. त्यामुळे इम्रान यांना उठता-बसता येत नाही. तसेच फारसे बोलता येत नाही. मात्र, त्यांची प्रकृती सुधारत असून, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले गेले आहे.

पुढे छायाचित्राद्वारे पाहा, कसे कोसाळले इम्रान खान स्टेजवरुन.....