आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Imran Khan A Cricket Captain And Playboy To Politician Latest News, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्ले बॉय ते पाकिस्तानमधील प्रभावशाली नेता... वाचा इम्रान खान यांचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या क्रिकेटपटूने पाकिस्तानच्या राजकारणात स्वत:ला एक राजकीय नेता म्हणून प्रस्थापित केले. ते म्हणजे इम्रान खान. देशाच्या खेळपट्टीवरील इम्रान यांच्या बाऊन्सरने कोण घाबरत असेल, तर ते पंतप्रधान नवाझ शरीफ. राजधानी इस्लाबादमधील परिस्थिती नाजूक झाली आहे.
क्रिकेटमध्‍ये प्रवेश करण्‍यापूर्वी इम्रान यांची प्रतिमा प्ले बॉयप्रमाणे होते. तरुणी त्यांच्या नवाबी शैलीवर फ‍िदा व्हायच्या. अनेक महिलांनी त्यांच्या आयुष्‍यात आल्या. यात क्रिस्तियान बॅकर, सुसान्नाह कॉन्सटेनटाइन, अॅमा सर्जेंट आणि सीता व्हाइटसारख्‍या सौंदर्यवतींचा समावेश होता. यातून इम्रान खान लवकर सावरले आणि आज ते पाकिस्तानमधील एक प्रभावशाली राजकीय नेता झाले आहे. 1996 मध्‍ये त्यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाची स्थापना केली.
वैयक्तिक आयुष्‍य
इम्रान यांचा विवाह ब्रिटिश पत्रकार जेमिमा मार्शलशी झाला होता. हा प्रेमविवाह होता. विवाहाच्या वेळी ती इम्रान यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होती. काही महिन्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. 2004 मध्‍ये जेमिमा आणि इम्रान खान यांच्यामध्‍ये दुरावा निर्माण झाला.
आईच्या स्मणार्थ दवाखाना
इम्रान खान यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1952 मध्‍ये लाहोर येथे झाला. त्यांचे वडील इकरमुल्लाह खान पेशाने सिव्हिल इंजिन‍िअर होते. त्यांची शौकत खान्नुम यांचे निधन कॅन्सरने झाला होता. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी कॅन्सर दवाखाना सुरु केला. त्यांचे इंग्लंडमधील रॉयल ग्रामर स्कूल वॉरसेस्टरमध्‍ये शालेय शिक्षण झाले. 1972 मध्‍ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून इम्रान यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी मिळवली.
विश्‍व कप जिंकला
पाकिस्तानच्या या महान क्रिकेटरचा सहभाग असलेल्या संघाने 1992 मध्‍ये विश्‍वकप जिंकला होता. याच वर्षी त्यांनी क्रिकेटमधून सन्यास घेण्‍याची घोषणा केली.
पुढील छायाचित्रांमधून पाहा क्रिकेटपटू ते राजकारणातील इम्रान खान यांचा प्रवास....