आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेहामबरोबर विवाह केल्याचे इम्रान खानने केले मान्य, म्हणाला लवकरच देणार \'गूड न्यूज\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - क्रिकेटपटू ते राजकीय नेते असा प्रवास केलेले पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे नेते इम्रान खान यांनी टिव्ही अँकर रेहाम खान हिच्याशी विवाह केल्याचे मान्य केले आहे. लवकरच याबाबत गूडन्यूज देऊ असे ते म्हणाले आहेत. लवकरच गूड न्यूज देऊ असे इम्रान खान म्हणाले आहेत. मंगळवारी इस्लामाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात ते अधिकृत माहिती देऊ शकतात.

इम्रानने लंडन एअरपोर्टवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेहामबरोबर विवाह केल्याचे मान्य केले आहे. आता लपवण्यासारखे काहीही राहिले नसल्याचे इम्रान म्हणाले. इम्रान खान शनिवारी लंडनला त्यांची पहिली पत्नी जेमिमा आणि मुलांना भेटण्यासाठी गेले होते. इम्रानने हा विवाह करण्यापूर्वी जेमिमा यांची परवानही घेतल्याची माहिती मिळते आहे. गेल्यवर्षी नोव्हेंबर महिन्यातही इम्रान खानचा रेहामबरोबर विवाह झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. पण त्यावेळी इम्रानने हे वृत्त फेटाळले होते.
कोण आहेत रेहाम खान?
रेहाम खान सध्या डॉन न्यूजशी संलग्न आहेत. त्या आधी त्या बीबीसी वाहिनीवर हवामानाशी संबंधित वृत्ताचे अँकरींग करायच्या. रेहाम या घटस्फोटीत असून त्यांना तीन मुलेही आहेत. रेहाम यांचा जन्म लिबियामध्ये झाला आहे. पण त्यांचे आई वडील पाकिस्तानी आहेत.
तर इम्रान यांचा पहिला विवाह जेमिमा खान यांच्याशी झाला होती. पण 2004 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. जेमीमा खान ब्रिटनच्या एका श्रीमंत आणि शक्तीशाली कुटुंबाच्या सदस्य आहेत. इम्रान आणि जेमिमा यांना सुलेमान आणि कासीम अशी दोन मुले आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, रे‍हम‍च्या विरोधात तयार करण्यात आलेले फेलबूक पेज आणि Photo's