आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खानवर दहशतवादाचा खटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्यावर दहशतवादी कारवाया केल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे. येथील पंजाब प्रांताचे माजी कायदामंत्री राणा सनाउल्ला यांच्याविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप खान यांच्यावर करण्यात आला आहे.
फैसलाबाद रॅलीदरम्यान त्यांनी हिंसेला प्रोत्साहन दिल्याचे सांगण्यात आले. सोमवारी आपल्या प्रदेशात खान व त्यांच्या समर्थकांनी चिथावल्याने येथे झटापट झाली व एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सनाउल्ला यांनी सांगितले.
पाकिस्तान मुस्लिम लीग आवामी प्रमुख शेख राशीद, पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे नेते शहा मेहमूद कुरेशी, अरिफ अलवी, असद उमर यांनाही यात दोषी मानण्यात आले आहे. इम्रान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पार्टीने फैसलाबाद येथे अराजकता व दहशत निर्माण करण्याचे सगळे प्रयोग केले असल्याचा आरोप सनाउल्ला यांनी केला आहे. माझ्या घरावर ५०० समर्थकांना हल्ला करण्याचे आदेश इम्रान यांनीच दिले, असा आरोप त्यांनी केला आहे. केवळ आपले समर्थक घटनास्थळी असल्यानेच आपण वाचलो, असे सनाउल्ला म्हणाले.