आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Khan, Qadri Lead Thousands Of Protestors To PM Sharif\'s House

पाकिस्तानमध्‍ये इम्रान खान यांच्या समर्थकांवर पोलिस कारवाई, 7 ठार तर 200 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी रेड झोनमध्‍ये ठाण मांडून बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी शनिवारी( ता. 30) रात्री पंतप्रधान निवास आणि संसद भवनावर हल्ला चढवला. त्यांना रोखण्‍यासाठी पोलिसांनी आश्रू गॅस, रबर गोळ्या आणि लाठीचार्ज केला. या कारवाईत 7 लोक ठार तर 250 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या माध्‍यमांनी दिली आहे.
हल्ल्याची कृती करणा-या आंदोलकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्‍वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. रात्री 1 वाजेपर्यंत सुमारे 25 हजार आंदोलक रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती न‍ियंत्रणाबाहेर गेल्याने सरकारने लष्‍कराला बोलवले आहे. इम्रान खान आणि कादरी यांनी नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी 14 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे.

संसदेत आंदोलकांचा प्रवेश
आंदोलक रात्री संसद भवनात घुसले होते. त्यांना बाहेर काढण्‍यासाठी एक भिंत पडण्‍यात आली. पोलिस कारवाईत 100 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्‍यात आली आहे.

आज काय होऊ शकते
* इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तानमध्‍ये बंदचे आवाहन केले आहे.
* शरीफ यांच्यावर नाराज असलेले लष्‍कर कारवाई करु शकते.
* परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास लष्‍कर नवाझ शरीफ यांना राजीनामा देण्‍यास भाग पाडू शकते.
* काय आहे ?
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि मौलवी ताहिर उल- काद्री यांच्या समर्थकांनी गेल्या 17 दिवसांपासून राष्‍ट्रीय कायदेमंडळाच्या आवारात ठाण मांडले आहे. त्यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी लष्‍कर आंदोलकारी आणि सरकारमध्‍ये मध्‍यस्थीची भूमिका निभावत आहे. कादरी यांनी शरीफ यांच्या राजीनाम्यास 24 तासांचा अवधी दिला होता. दुसरीकडे आंदोलकांनी संसदभवन आणि पंतप्रधान निवासावर मोर्चा नेला होता. विविध अडथळे पार कर‍ित ते पंतप्रधानाच्या निवासाकडे निघाले होते. केवळ 500 मीटर अंतर शिल्लक असताना पोलिसांनी कारवाई करण्‍यास सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा रेड झोनमध्‍ये चालू असलेल्या आंदोलनाची छायाचित्रे...