आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Khan Supporters March Towards Islamabad\'s Red Zone

नवाझ शरीफ यांनी आज राजीनामा दिला नाही तर निवासस्थानात प्रवेश करू- इम्रान खान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील राजकीय तणाव बुधवारी आणखीच वाढला आहे. तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांचे हजारो समर्थक रेड झोन असणार्‍या संसद परिसराच्या दिशेने वळल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. तसेच इम्रान खान यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत मुदत दिली आहे.

शरीफ यांनी राजीनामा दिला नाही तर आंदोलक त्यांच्या निवासस्थानात प्रवेश करतील, असा इशाराही इम्रान खान यांनी दिला आहे. माझे काही बरेवाईट झाले तर नवाझ शरीफ यांच्याकडून बदला घेण्याचेही खान यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे.

पाकिस्तान लष्कराने राजधानीचा ताबा घेतला असून आकाशातून लक्ष ठेवले जात आहे. विरोधीपक्षाच्या 150 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत गडबड झाल्यामुळेच सत्ताधारी पाकिस्तानी मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाला 190 जागी विजय मिळाल्या असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. शरीफ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
इम्रान खान म्हणाले, हा सविनय कायदेभंग
रेड झोनमधील सुप्रीम कोर्ट, संसद भवन, पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालय, राजदूत कार्यालयासह महत्त्वाच्या इमारतींना संरक्षण देण्यात आले आहे. आहे. इम्रान खान यांनी, आमचे आंदोलन घटनात्मक आणि लोकशाहीला धरून आहे, असे ट्विट करून स्पष्ट केले. त्यांनी या आंदोलनाला सविनय कायदेभंग म्हटले आहे.
इम्रान खान यांच्या नेतृत्वात सरकारविरोधी मोर्चा गुरुवारी लाहोरमधून सुरु झाला आहे. त्या दिवशी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन होता. या मोर्चाला 'आझाद मार्च' नाव देण्यात आले आहे. विरोधकांची मागणी नवाज शरीफ यांचा राजीनामा आणि नव्याने संसदीय निवडणुकांची आहे. दुसरीकडे तहीर उल-कादरी यांनी अवामी पार्लमेंट (जन संसद) स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

‘अवामी पार्लमेंट ’ : कादरी यांनी पर्यायी संसद स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यास अवामी पार्लमेंट असे नाव देण्यात येईल. दुसरीकडे कादरी यांनी सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यास मंगळवारी नकार दिला. आम्ही सरकारला सत्ता सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. ही मुदत सोमवारी सायंकाळी संपली, असे कादरी यांचे म्हणणे आहे.

कादरी यांनी इस्लामाबादध्ये शरीफ यांच्याविरोधात अनेक मोर्चे काढले आहेत. सरकारने इम्रान खान आणि कादरी यांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, दोन्ही विरोधी नेत्यांना तो फेटाळला आहे. कादरी यांच्याविरोधात हत्येच्या एका प्रकरणात वॉरंट जारी करण्यात आले आहे.
शरीफ यांचा राजीनामा देण्यास नकार
पाकिस्तानच्या रेड झोनमध्ये आंदोलक आल्यानंतर इम्रान खान यांनी महत्त्वाच्या इमारतींमध्ये आंदोलकांनी घुसू नये असे आवाहन केले असताना आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शरीफ यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नसल्याचे म्हटले आहे. शरीफ रेड झोनमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अधिकार्‍यांसह उपस्थित आहेत. प्रत्येक घटनेकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे.
इम्रान खान यांचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला इशारा
इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेला इशारा दिला आहे. त्यांनी नवाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारला या दोन्ही जागतिक संस्थानी आर्थिक सहाय्य देऊ नये (कर्ज) असा इशारा दिला आहे.

छायाचित्र - आझादी मार्च वेळी समर्थकांचा उत्साह वाढविताना इम्रान खान
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इम्रान खान आणि धर्मगुरु ताहीर-उल-कादरी यांच्या मोर्चाची छायाचित्रे