Home »International »Other Country» In 2001 Pakisstan Think To Attack On Bharat

फक्त 8 सेकंदात पाकिस्‍तानकडून भारतावर अण्‍वस्‍त्र हल्‍ला शक्‍य

वृत्तसंस्था | Jun 16, 2012, 04:14 AM IST

  • फक्त 8 सेकंदात पाकिस्‍तानकडून भारतावर अण्‍वस्‍त्र हल्‍ला शक्‍य

लंडन - पाकिस्तान भारतावर अवघ्या आठच सेकंदांत अण्वस्त्र हल्ला करू शकतो. 2001 मध्ये इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या एका जनरलने केला होता. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या अत्यंत विश्वासू सहकार्‍याच्या डायरीत हा इशारा देण्यात आला आहे.
भारताने पाकिस्तानला दुबळे समजू नये. आमच्या अण्वस्त्र क्षमतेची भारताला आठवण करून द्या, असे पाकिस्तानी लष्कराच्या जनरलने टोनी ब्लेअर यांचे माजी संप्रेषण संचालक अँलिस्टेअर कॅम्पबेल यांना सांगितले होते. ब्रिटनचे परराष्ट्र धोरण सल्लागार सर डेव्हिड मन्निंग यांनी पाकिस्तान कधीही अण्वस्त्र हल्ला करू शकतो, असे सांगितल्यामुळे पाकच्या या वाढत्या धोक्यामुळे ब्रिटन चिंतित झाला होता. कॅम्पबेल यांच्या डायरीतील काही भाग ‘द गार्डियन’ या दैनिकात सोमवारी आणि मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्यात हा इशारा देण्यात आला आहे.
कॅम्पबेल यांच्या या डायरीत 9/11च्या हल्ल्यापासून ऑगस्ट 2003 च्या इराक युद्धानंतर त्यांनी पदभार सोडेपर्यंतचे संदर्भ आहेत. 2001 मध्ये ब्लेअर यांनी भारतीय उपखंडाला भेट दिल्यानंतर हा अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. कॅम्पबेल लिहितात: या डिनरच्या वेळी मी पाच स्टार असलेल्या दोन जनरलच्या मध्ये बसलो होतो. भारत आपल्या नागरिकांवर स्वत:च अत्याचार करत आहे आणि ‘स्वातंत्र्य सैनिकांना’ (काश्मिरातील अतिरेक्यांना) जबाबदार धरत आहे, असे ते वारंवार बोलत होते. भारताची प्रचंड मोठी लोकसंख्या आणि पाकपेक्षा सातपटीने मोठे क्षेत्रफळ असले तरी एक दिवस भारतामुळेच अण्वस्त्र युद्ध होणार आणि आपण त्यांचा धुव्वा उडवणार, असेही ते म्हणाले.
भोजन आटोपून निघण्याची वेळ आली तेव्हा त्या दोन जनरलमधील एका प्रफुल्लित झालेला जनरल मला म्हणाला,‘भारताला आमच्या अण्वस्त्र क्षमतेची आठवण करून द्या. अवघ्या आठ सेकंदांत आम्ही त्यांच्यावर अण्वस्त्र हल्ला करू शकतो’ आणि तो मोठय़ाने हसला. अफगाणिस्तानमध्ये बॉम्बहल्ले चढवण्यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनला पाकिस्तानचा पाठिंबा मिळवायचा होता. त्यामुळे 9/11 चा हल्ला झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आधीच ब्लेअर यांनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी पाकिस्तानला भेट दिली होती. पाकिस्तानी नेतृत्व ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनला मदत करण्याचे आश्वासन देत होते. मात्र, त्यांच्यावर भरोसा ठेवणे अवघड होते. ब्लेअर यांच्या भेटीनंतर 13 डिसेंबर 2001 रोजी भारताच्या संसदेवर हल्ला झाल्यानंतर इस्लामाबाद आणि नवी दिल्लीतील संबंध स्फोटक वळणावर आले होते, असे गार्डियनने म्हटले आहे. त्यानंतर 4 जानेवारी 2002 रोजी कॅम्पबेल लिहितात : ‘पाकिस्तान कधीही अण्वस्त्र हल्ला करू शकतो. तो भारतावर मोठय़ा प्रमाणावर अण्वस्त्र हल्ला चढवायलाही मागे पुढे पाहणार नाही, असे डेव्हीड मॅन्निंग यांनी पुरावा देत स्पष्टपणे सांगितले होते.’
मुशर्रफांचा कावा
पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी इस्लामाबादमध्ये 5 ऑक्टोबर 2001 रोजी कॅम्पबेल यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते, त्या वेळी पाकिस्तानने भारतावर आठ सेकंदांत अण्वस्त्र हल्ला करण्याचा इशारा दिला होता, असे या डायरीत म्हटले आहे.
पाक बनवतोय बॉम्बवर बॉम्ब, भारतीय लष्कर मात्र दुफळीने ग्रस्त
भारत-पाकमध्‍ये अण्‍वस्‍त्र युद्ध भडकण्‍याची अमेरिकेला भीती
पाकिस्‍तान करतोय अण्वस्त्रावर अडीच अब्ज डॉलर खर्च!Next Article

Recommended