आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In 2013, Year Of The Highest Grossing Casinos Business Aedalsana

कॅसिनो व्यावसायिक अ‍ॅडल्सन यांची सन 2013 मध्ये सर्वाधिक कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन -अमेरिकेतील कॅसिनो किंग शेल्डन अ‍ॅडल्सन 2013 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे अमेरिकी व्यावसायिक ठरले आहेत. त्यांनी दररोज 254 कोटी रुपये कमावले. वर्षभरात त्यांच्या मालमत्तेत 930 अब्ज रुपये वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 2300 अब्ज रुपये झाली आहे. म्हणजे एका वर्षात मालमत्तेत 68 टक्के वाढ झाली आहे.
फोर्ब्स मासिकाने या वर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळवणा-या व्यावसायिकांची यादी तयार केली आहे. शेल्डन लास वेगास, मकाऊ आणि सिंगापूरमध्ये अनेक कॅसिनो चालवतात. त्यांच्यानंतर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचे नाव यादीत दुस-या क्रमांकावर आहे. त्यांनी या वर्षी दररोज 230 कोटी रुपये कमावले. त्यांच्या मालमत्तेत 843 अब्ज रुपयांची वाढ झाली. आता त्यांची एकूण संपत्ती 1,621 अब्ज रुपये आहे. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनाही 2013 मध्ये 824 अब्ज रुपये उत्पन्न मिळाले.
वॉरन बफे चौथ्या क्रमांकावर
या यादीमध्ये चौथ्या स्थानावर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे आहेत. त्यांनी रोज 205 कोटी रुपये कमावले. अ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाप्रमाणे 824 अब्ज रुपयांची आपल्या संपत्तीत वाढ झाली. एकूण संपत्तीच्या प्रकरणात ते सर्वात पुढे आहेत. त्यांची 3720 अब्ज रुपये संपत्ती आहे. यादीत पाचवे, सहावे व सातवे स्थान जगातील प्रसिद्ध रिटेलर वॉलमार्टचे संचालक वॉल्टन कुटुंबाच्या सदस्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या मालमत्तेची माहिती देण्यात आली नाही. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज नवव्या स्थानावर आहेत. त्यांनी 2013 मध्ये 582 अब्ज रुपये कमावले. त्यांच्या मालमत्तेत वाढ होऊन ती 1890 अब्ज रुपये झाली आहे. दहाव्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे चेअरमन बिल गेट्स आहेत. त्यांनी या वर्षी दररोज 158 कोटी रुपये कमावले. त्यांच्या उत्पन्नात एकूण 576 अब्ज रुपयांची भर पडली असून एकूण संपत्ती 4594 अब्ज रुपये झाली आहे.