आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In A Badaun Like Incident, A 19 Year Old Girl Raped And Hanged On Tree

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात बदायू : 20 वर्षीय तरुणीचा बलात्कार, झाडावर टांगला होता मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानमध्ये बदायूं येथील गँगरेप प्रकरणासारखीच एक घटना झाल्याचे समोर आले आहे. प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या एका युवतीची गँगरेपनंतर हत्या करून तिचा मृतदेह झाडावर टांगण्यात आला होता. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील लय्याह येथे झालेल्या या दुर्घटनेमध्ये तीन तरुणांनी तरुणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही तरुणी गुरुवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने दाखल केली होती. नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला मात्र तरुणी सापडली नसल्याचे सांगण्यात आले. दुस-या दिवशी तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
असे क्रौर्य पाहिले नाही?
वरिष्ठ पोलिस अधिकारी सआदत अली चव्हान, यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षांच्या नोकरीत्या इतिहासात त्यांनी पाहिलेली ही सर्वात क्रूर घटना होती. अत्यंत क्रूरपणे या तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. याआधी उत्तर प्रदेशातील बदायूं येथेही दोन तरुणींवर अत्याचार केल्यानंतर त्यांचे मृतदेह झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या तरुणीचे सर्व कपडे फाटलेले होते आणि त्याच अस्थेत तिला झाडावर लटकवण्यात आले होते. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी आरोप मान्य केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल
पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी अहलावही मागवला आहे.
फोटो - पाकिस्तानात पथनाट्याद्वारे जनजागृती करणारे कलावंत