आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In America Robitic Dron Historically Landing On War Vessel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत युद्धनौकेवर रोबोटिक ड्रोनचे ऐतिहासिक लँडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - हजारो फूट उंचीवरून युद्धनौकेवर विमानाचे लँडिंग करण्याचे कौशल्य शिकण्यासाठी नौदलाच्या वैमानिकांना अनेक वर्षे सराव करावा लागतो. त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान असले तरी अमेरिकेच्या मानवरहित एक्स-47 बी विमानाने (ड्रोन) गुरूवारी ही किमया सहजपणे साध्य केली. अमेरिकेची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. जगभरात अमेरिका ड्रोन हल्ल्यांमुळे अगोदरच खूप चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाने प्रायोगिक विमानरहित विमानाची यशस्वी चाचणी घेतली आहे. विमान अगदी सहजपणे ठरलेल्या वेळेत व स्थितीत युद्धनौकेवर उतरले. त्यामुळे अतिउच्च दर्जाच्या संगणक सॉफ्टवेअरमुळे हे साध्य होऊ शकले. या अगोदरच्या प्रेडेटर हे मानवरहित विमान एक्स-47 बी च्या तुलनेत मंद आहे. त्याची क्षमता 2 हजार 100 किलो मीटर मैल आहे.


कोठे झाली चाचणी ?
अमेरिकेच्या ड्रोनची प्रायोगिक चाचणी मेरीलँड ते व्हर्जिनिया दरम्यान घेण्यात आली. विमानाने पॅटूशेंट नदीवरील नौदलाच्या हवाई तळावरून उड्डाण घेतले. त्यानंतर ते यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू बुश युद्ध नौकेवर यशस्वीरित्या लँड झाले.


कसे करते कार्य ?
मानवरहित विमानाला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नियंत्रित केले जाते. एक्स-47 बी विमानाची या अगोदर 14 मे रोजी यशस्वी चाचणी झाली होती. विमानाला शेपटाचा भाग नाही. या ड्रोनमुळे अमेरिका शत्रूवर करडी नजर ठेवू शकेल.


एक्स-47 बी वैशिष्ट्ये
12 मीटर लांबी
62 फुटांचे पंख
40 हजार फूट उंचीवर उड्डाण
06 हजार 350 किलो वजन