आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात 7 भावंडांसह 8 चिमुकल्यांची भोसकून हत्या, आईला घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियातील उत्तरेकडील केन्स शहरात 7 भावंडांसह एकाच कुटुंबातील 8 मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलिस चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून पोलिसांनी या भावंडांच्या आईला ताब्यात घेतले आहे. तिच्यावर अद्याप कोणताही आरोप लावण्यात आलेला नाही.
पोलिसांनी सांगितले, की ही घटना घडलेल्या घराबाहेर 34 वर्षीय महिला जखमी अवस्थेत सापडली होती. यावेळी घरात 7 भावंडांसह 8 चिमुकले मृतावस्थेत सापडले होते. त्यांची भोसकून हत्या करण्यात आली होती. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थीर आहे.
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाचे छायाचित्र....