लंडन- हे काही तालिबानी फर्मान नाही. ब्रिटनमधील एका शाळेने आपल्या विद्यार्थिनींना स्कर्ट परिधान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुलींना ट्राउझर घालूनच शाळेत येण्याचा नवा दंडक सुरू झाला आहे. त्याशिवाय 7 ते 11 वर्षे वयाच्या मुलींना यापुढे मेकअप करून शाळेत येण्यास मनाई करण्यात आली आहे.
डिस हायस्कूलच्या व्यवस्थापनाने हा कडक नियम लागू केला आहे. मुलींचे स्कर्ट दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. ही बाब अव्यवहार्य आणि अश्लीलतेकडे झुकणारी आहे. अनेक मुली अगोदरच ट्राउझर्स परिधान करून शाळेत येऊ लागल्या आहेत.
शाळेचे प्रमुख जॉन हंट म्हणाले, काहींना स्कर्टवरील बंदी आवडलेली नाही; परंतु बहुतेक लोकांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. गणवेश बदलाचा निर्णय शाळेतील प्रशासक, विद्यार्थी आणि कर्मचार्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाशी आपला काहीही संबंध नाही, असे नॉरफॉक कौंटी कौन्सिलचे म्हणणे आहे. ही शाळा याच कौंटीअंतर्गत येते.