Home | International | China | in chaina heavy rain, 90 lakh people affected, inernational

दक्षिण चीनमध्ये महापूर, 90 लाख लोकांना पावसाचा फटका, 168 बळी,

वृत्तसंस्था | Update - Jun 21, 2011, 03:09 AM IST

मध्य आणि दक्षिण चीनला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून परिसरातील साऱया नद्या दुथडी भरून वाहत असल्याने महापुराचा तडाखा बसला आहे.

  • in chaina heavy rain, 90 lakh people affected, inernational

    china_258_02बिजींग- मध्य आणि दक्षिण चीनला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून परिसरातील साऱया नद्या दुथडी भरून वाहत असल्याने महापुराचा तडाखा बसला आहे. लाखो लोकांना या पुराचा फटका बसला असून हजारो जण बेपत्ता झाले आहेत.
    चीनचे जलस्रोत मंत्री चेन लेई यांनी या भयंकर पूरस्थितीची माहिती देताना सांगितले की, मध्य आणि दक्षिण चीनमधील 10 नद्यांना महापूर आला आहे. या नद्यांवरील धरणे धोक्यात आली आहेत. आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे.
    सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, झिजियांग प्रांतातील क्विआंतांग नदीच्या किनारपट्टीवरील तीन लाख लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लान नदीवरील 70 कि. मी. लांबीचा कालवा पाण्याच्या दबावामुळे फुटण्याचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे झिजियांग शहरात पुराचे पाणी घुसण्याची शक्यत आहे. परिणामी कालव्याच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. 1966 नंतर प्रथमच लान नदीला एवढा भयंकर पूर आला आहे असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. हुबेई, जिआंगझीसह आठ प्रांतांना या महापुराने तडाखा दिला असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत मागील दशकातील सर्वात भयंकर दुष्काळ अनुभवणाºया हुबेई, आन्हुई आणि झिजियांग या प्रांतांत आता तुफानी पावसाने महापुराची स्थिती आणली आहे.Trending