Home | International | China | in china, for breakup, outsourcing

चीनमध्ये प्रेम प्रकरणे संपुष्टात आणण्यासाठी चक्क आऊटसोर्सिंग

वृत्तसंस्था | Update - Sep 09, 2011, 07:58 AM IST

एखादे नाते संपविणे, ही गोष्ट तशी वेदनादायी असते. परंतु त्यावरही आता फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणे संपुष्टात आणण्यासाठी चक्क आऊटसोर्सिंग म्हणून मध्यस्थाचा चीनमध्ये सर्रास वापर करण्याची पद्धत रुळू लागली आहे.

 • in china, for breakup, outsourcing

  बीजिंग- एखादे नाते संपविणे, ही गोष्ट तशी वेदनादायी असते. परंतु त्यावरही आता फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणे संपुष्टात आणण्यासाठी चक्क आऊटसोर्सिंग म्हणून मध्यस्थाचा चीनमध्ये सर्रास वापर करण्याची पद्धत रुळू लागली आहे.
  प्रेम सुरुवातीला हळुवार वगैरे असते, नंतर त्याकडे झेंगट म्हणून पाहिले जाते. अशावेळी नाते संपविण्याकडे कल असतो. दोघांपैकी एकाला हे नको असेल तर दुसºयाला नात्याचे संपणे वेदना देणारे ठरू शकते. म्हणून मध्यस्थाचा जन्म झाला असावा. हे मध्यस्थ दोन जोडप्यांना आपल्या कौशल्याचा वापर करून वेगळे करतात, असे वृत्त दी डेली टेलिग्राफने दिले आहे.
  सध्या चीनमध्ये 40 ब्रेक-अप एजंट आहेत. ही मंडळी आपल्या काडीमोड करण्याच्या कौशल्याची अभिमानाने जाहिरातही करतात. खात्रीशीर काडीमोड करण्यासाठी या एजंटला 300 यॉन मोजावे लागतात. ब्रेकअपसाठी फोन किंवा ईमेलचा वापर केला जातो. यातूनही काही झाले नाही, तर अधिक आक्रमकपणे काम केले जाते. एजंटांकडून अनेकवेळा प्लॅटिनम सेवाही दिली जाते. याचा अर्थ ब्रेकअपच्या वेळी एखाद्या जोडीदाराला अधिकच दु:ख होत असेल तर त्याला काहीतरी भेटवस्तू दिली जाते. ज्या जोडप्यांना ब्रेकअप घ्यायचाय परंतु दोघापैकी एक डोकेदुखी आहे. अशावेळी लवकर वेगळे होण्याची इच्छा निर्माण होते. अशा परिस्थितीत एजंट या जोडप्यांत गैरसमज निर्माण होईल, अशी कृती करतात. त्यांच्यात संघर्ष लावून दिला जातो. दरम्यान, ब्रेकअप करण्याची कृती ही नैतिक प्रश्न निर्माण करते, असे या एजंटांना वाटत नाही. कारण मी काही वाईट तंत्राचा यात वापर करीत नाही. हा केवळ एक बिझनेस आहे. यात काहीही गैर नाही. आता चीनच्या काही वेबसाईटवर हॅपी ब्रेक-अप नावाच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत. सध्या 1 हजार युजर्सने त्याला भेट दिली आहे. या नेटिझन्सनी आपल्या व्यथा त्यावर मांडल्या आहेत, असे एका एजंटाचे म्हणणे आहे.
  मनीबॅक गॅरंटी
  या व्यवसायात चीनमधील एजंट एकदम आत्मविश्वासाने बोलतात. आम्ही खात्रीशीरपणे ब्रेकअप करतो. अगदी शंभरटक्के खात्रीने. अलीकडेच दहा जोडप्यांना आपण अशी मदत केली, असे झेजिआंग प्रांतातील एका एजंटने सांगितले. यात अपयश आले तर पैसे परत केले जातात. परंतु तशी वेळ येत नाही, असे तो म्हणतो.
  20 दिवसांचे पॅकेज
  पहिल्या दहा दिवसांत संघर्ष निर्माण करून देणे. पाच दिवसांनंतर ब्रेकअपचा प्रस्ताव आणि त्यानंतर वीस दिवसांच्या आत ब्रेकअपचे डील अशाप्रकारे पूर्ण केले जाते.

Trending