आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनचे मुख्य व्यावसायिक शहर शांघायला पाणी पुरवणा-या नद्यांमध्ये नुकतेच हजारो डुकरे मृतावस्थेत आढळून आल्याने देशातील प्रदूषणाची भयावह परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. चीनमध्ये दरवर्षी टॉक्सिक प्रदूषणाने सात लाखांवर मृत्यू होतात. प्रदूषणाच्या काही चिंताजनक बाजू पुढील प्रकारे...
ताई तळे- चीनमध्ये ताज्या पाण्याचे तिसरे सर्वात मोठे स्रोत असलेल्या ताई तळ्याला सरकारनेच घातक जाहीर केले आहे. हे तळे तीन कोटी लोकांना पाणीपुरवठा करते. तळ्याचे पाणी विषारी रसायनांमुळे खराब झाले आहे.
जमिनीतच विष - उत्तर पूर्वेकडील चीनच्या तियानिंगच्या जवळपास जस्त जमल्याने जमीन आणि पाणी दूषित झाले आहे. या भागात डिकेंसियनचे उत्पादन केले जाते. येथील गव्हात जस्तचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे.
सल्फर डायऑक्साइड- उत्तर पश्चिम चीनमध्ये परिवहन आणि सांस्कृतिक घडामोडींचे मुख्य केंद्र उरुमकीतील हवेत सल्फर डायऑक्साइड आणि इतर कणांचे प्रमाण आवश्यक मात्रेपेक्षा दहापट अधिक असल्याचे दिसून आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.