आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळखोर सायप्रसमध्ये बचत खात्यावर कर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रुसेल्स - दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सायप्रसला युरोपियन युनियनने बेलआऊट पॅकेज देण्याचा निर्णय घेतला असून सायप्रस सरकारने नुकसान भरून काढण्यासाठी बचत खात्यावर कर लादला आहे. देशात सुमारे 1 लाख युरोहून अधिक रकमेवर खातेदारास 9.9 टक्के कर द्यावा लागणार आहे. खात्यावर 1 लाख युरोपेक्षा कमी रक्कम असेल तर त्यांना 6.7 टक्के कर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बचत रकमेवरील अर्जित व्याजही कराच्या कक्षेत आले आहे. उद्योग कराची मर्यादा तर 2.5 वरून थेट 12.5 एवढी केली आहे. बँकांना सोमवारपर्यंत सुटी जाहीर केली आहे.

ब्रुसेल्समध्ये युरोपियन संघटनेचे सदस्य देश आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यात दहा तास बैठक झाली. त्यात सायप्रससाठी 13 अब्ज डॉलर्सचे बेलआऊट पॅकेज मंजूर करण्यात आले. त्या बदल्यात कररचना कठोर करण्यासाठी सायप्रसवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव आणण्यात आला.