अमेरिकेचे ड्रोन हल्ले सुरुच, 24 तासात 45 ठार; पाकची सैनिक माघारी घेण्याची धमकी

Agency

Jul 12,2011 03:47:42 PM IST

मीरनशाह (पाकिस्तान)- अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. अमेरिकेने पाकिस्तानची नाराजी पत्कारत व विरोध करत हल्ले सुरुच ठेवले आहेत. पाकिस्तानातील उत्तर पश्चिम भागात ड्रोन हल्ले केले असून गेल्या २४ तासात ४५ संशयित दहशतवादी मारले गेले आहेत. हा आतापर्यत केलेला सर्वाधिक मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, पाकिस्तान सरकारने अमेरिकेला धमकी दिली असून लष्करी आर्थिक मदत न दिल्यास अफगाणिस्तानच्या सीमेवर लढत असलेले सैनिक आम्ही माघारी बोलवू.
सोमवारच्या रात्रीपासून उत्तरी वझीरीस्तानमध्ये दहशतवादी कंपाऊंड गाडीवर नऊ ड्रोनचे हल्ले करण्यात आले. त्यात २५ दहशतवादी मारले गेले. त्यानंतर दक्षिण वझीरीस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात ५ दहशतवादी ठार झाले. मंगळवारी सकाळी पुन्हा उत्तर वझीरीस्तान केलेल्या हल्ल्यात १५ दहशतवादी ठार झाले.
मात्र अमेरिकेने मदत थांबविण्याच्या घोषणेमुळे पाकिस्तानची चीडचीड वाढली असून, मदत न केल्यास अमेरिकेसाठी अफगाणिस्तान सीमेवर लढत असलेले जवान आम्ही माघारी बोलवू, अशी धमकी दिली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी सांगितले की, आम्हाला आर्थिक मदत केल्याशिवाय अफगाणिस्तानातील डोंगराळ भागात सैनिकांची फौज ठेवू शकत नाही. अमेरिकेने मदत थांबविल्यास सुमारे ११०० चेक पोस्ट भागातून सैनिक हटवणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. यापुढे आम्ही सीमा भागातील सैनिक माघारी बोलवणे हे प्राथमिक उद्दिष्ठ असेल. अफगाणिस्तान व पाकिस्तान हे एकमेंकावर हल्ल्याचे आरोप करत आहेत. याबाबत मुख्तार म्हणाले, जर हे हल्ले असेच सुरुच राहिले तर युध्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अमेरिकेने नुकतीच पाकिस्तान दिली जाणारी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची आर्थिक लष्करी मदत देण्याचे नाकारले आहे.

X
COMMENT