(पाळलेल्या सिंहिणीवर डॉक्युमेंटरी तयार करणाऱ्या अॅंकरवर सिंहिणीने असा केला हल्ला. बघा व्हिडिओ.)
वाघ आणि सिंह पाळणे किती धोकादायक आहे, हे या व्हिडिओवरून दिसून येते. त्यांना कितीही प्रेम दिले तरी कधी ना कधी ते हिंस्त्र होतातच. फ्रान्समधील एका महिलेने सिंहिण पाळली आहे. तिच्यावर डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी एक टीम महिलेच्या घरी गेली होती. यावेळी सिंहिणीने अॅंकरवर जोरदार हल्ला चढवला. त्याला जखमी केले.
सिंहिणीच्या हल्ल्याने अॅंकर भयभीत झाला. त्याने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिंहिणीने त्याला घट्ट पकडले होते. सिंहिणीच्या मालकिणीने त्याला सोडविण्याचा कसोशिने प्रयत्न केला. जरा वेळाने सिंहिणीने त्याला सोडले. पण तोपर्यंत त्याचे कपडे फाटले होते. त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या.
पुढील स्लाईडवर बघा, सिंहिणीने अॅंकर कसा हल्ला चढवला...