आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्‍समधील हे घर फक्त 70 रूपयांत विकले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ई-बे वेबसाइटच्या फे्रंच व्हर्जनवर केलेल्या एका लिस्टिंगवर अचानक खळबळ उडाली. अ‍ॅब्रेस्लेमधील एक भूतबंगला अवघ्या 70 रुपयांत विकण्यासाठी कोणीतरी लिस्टिंग केली होती. जवळपास फुकटातच मिळणा-या घराबाबत लोकांमध्ये कुतूहल वाढणे साहजिकच होते. अनेक मोठ्या न्यूज चॅनेल्सनीसुद्धा या बातमीला मोठी प्रसिद्धी दिली.
माऊड 69620 नावाने हे घर विकणा-या महिलेने घरावर असे पाणी सोडण्याची काही कारणे दिली आहेत.

ई-बे वर दिलेल्या माहितीनुसार 50 च्या दशकात या घरात राहणा-या एका दांपत्याची निर्घृण हत्या झाली होती. आता अतृप्त आत्मे या घरात भटकत असतात. घरात अदृश्य शक्तींचा वावर जाणवतो. कोणी खिडकीची दारे ठोठावतो, चित्रविचित्र आवाज येतात, कधी गोंगाट-आरडाओरडा तर कधी कुजबुज ऐकू येते. घरातील वस्तू आपोआप सरकतात. घरात झालेल्या हत्येबाबत सांगितले जाते की, त्यावेळी या घराचे मालक असलेल्या एका जोडप्याची हत्या झाली होती. घरात असलेल्या गुप्त खजिन्यासाठी काही मजुरांनी या जोडप्याची निर्घृण हत्या केल्याचे सांगितले जाते. या वृत्ताला दुजोरा मात्र कधीच मिळू शकला नाही. कारण या जोडप्याचे मृतदेह कधीच सापडले नाहीत.


odditycentral.com