आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In New Year Polio Vaccination Cancel At Pakistan, Latest News In Marathi

पाकमध्ये नव्या वर्षातील पोलिओ लसीकरण रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानने या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रद्द केली आहे. यापूर्वी खैबर पख्तुनवा प्रांतात पोलिओ निर्मूलन मोहिमेतील कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून पाकने हा निर्णय घेतला आहे. रावळपिंडी जिल्ह्यातील काही भाग, खैर पख्तुनवा, संघशासित आदिवासी परिसर, पंजाबमधील काही भाग तसेच सिंध व बलुचिस्तानमध्ये सोमवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार होती. दरम्यान, या मोहिमेतील निर्धारित लक्ष्य, १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नॅशनल इम्युनिसेशन डेज मोहिमेदरम्यान साध्य केले जाईल, अशी माहिती पाकमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
सोमवारी मोहंमद आदिवासी परिसरातील चामार्कंद भागात पोलिओ लसीकरणासंदर्भातील बैठकीला जाणाऱ्या एका कार्यकर्त्यावर रिमोट कंट्रोलद्वारे स्फोटकांनी हल्ला करण्यात आला. त्याची प्रकृती गंभीर आहे. अफगाण सीमेवरील हा भाग पाकमधील अर्धस्वायत्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असून येथे परदेशी तसेच अंतर्गत अतिरेक्यांच्या वस्त्या आहेत.