लाहोर - पाकिस्तानची तिसरी आणि जगातील सातवी सर्वात मोठी मशिद रविवारी लोकांसाठी खुली करण्यात आली. ही मशिद बनवण्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. पाकिस्तानमध्ये बादशाही मशिद आणि फैजल मशिदीनंतर भारिया टाऊन जामिया मशिद तिसरी सर्वात मोठी मशिद आहे. 70 हजार लोकांच्या क्षमतेच्या या मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये जवळपास 25 हजार लोक बसू शकतात. सध्या जगातिल सर्वात मोठी मशिद मक्का येथे 'मशिद अल-हरम' ही आहे.
काय आहे विशेष
या मशिदचे आर्किटेक्ट नायर अली दादा यांनी असा दावा केला आहे की, यामध्ये 21 घुमट आणि 165 फुट उंचीचे चार मिनार आहेत. यामुळेच या मशिदीचे नाव जगातील मोठ्या मशिदींच्या यादीमध्ये गेले आहे. तरीही पाकिस्तानच्या आर्किलॉजिकल विभागाचे मुख्य आर्किटेक्ट यांच्या मते ही मशिद बादशाही आणि फैजल मशिदीनंतर तिसर्या क्रमांकाची मोठी मशिद आहे. या मशिदीमुळे देशाच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. यामध्ये बादशाही आणि वजीर खान मशिदीची ऐतिहासिक झलक पाहायला मिळते.
या मशिदीच्या निर्मितीमध्ये बलुआ दगडांच्या विटांचा वापर करण्यात आला आहे. ही मशिद बाहेरून पाहिली तर नारंगी रंगाची दिसते. अशा प्रकारची वाळू मुल्तानमध्ये सापडते, ज्यामुळे हा दगड बनतो. या मशिदीच्या निर्मितीसाठी कारागिरांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्याकडून भौमितिक आणि फुलांच्या आकाराच्या टाईल्स बनवण्यात आल्या. जवळपास एक हजार कारागिरांनी सतत तीन वर्षे कष्ट घेऊन ही मशिद बांधली आहे.
150 फुटच्या मिनारांमध्ये मुघलकालीन वास्तूशिल्पाचा प्रभाव पाहायला मिळतो. घुमटाच्या मध्यभागी आठ मोठे झुंबर लावण्यात आले आहेत. मलिक रियाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मशिदीचा दुसरा मजला हा खास महिलांसाठी आरक्षित आहे. ही मशिद लाहोरचे हॉलमार्क असेल आणि मुस्लिम जगामध्ये हे पाकिस्तानचे प्रतिक असेल.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, पाकिस्तानच्या या मशिदीचे फोटो...