आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द. आफ्रिकेत बेछूट गोळीबारात 36 कामगारांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेत आंदोलन करणा-या प्लॅटिनम खाणीच्या कामगारांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 36 कामगारांचा मृत्यू झाला. जोहान्सबर्गच्या ईशान्येकडील मारीकाना येथे ही खाण आहे. दक्षिण आफ्रिकेत रंगभेदाचे धोरण संपुष्टात आल्यानंतरच हे सर्वात मोठे हिंसक आंदोलन आहे.
पोलिस मंत्रालयाचे प्रवक्ते ज्वेली निसी यांनी सांगितले की, लोनमीन पीएलसी या प्लॅटिनम खाणीचे कामगार गेल्या आठवडाभरापासून संपावर गेले आहेत. गुरूवारी त्यांची निदर्शने सुरू असताना पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कामगारांना समजावण्याचे अनेकदा प्रयत्न करूनही ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे नाइलाजाने गोळीबार करावा लागला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गोळीबाराच्या या घटनेनंतर राष्ट्रपती जेकब जुमा हे मोझाम्बिक येथील शिखर वार्ता अर्ध्यावरच सोडून परत आले आहेत. ते या खाणीचा दौरा करून परिस्थितीची माहिती घेणार आहेत. हे खाण कामगार 30 टक्के पगारवाढीची मागणी करत आहेत.
कामगारांमधील गटबाजी या हिंसाचाराचे एक प्रमुख कारण असल्याचे मानण्यात येत आहे.