आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत उष्णतेची लाट, 30 मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिलाडेल्फिया - अमेरिकेतील शहरे उष्णतेने तापली असून बहुतांश शहरांचे तापमान 38 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. तापमान वाढल्याने 30 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
उकाडा प्रचंड झाल्याने अमेरिकन नागरिक हैराण झाले असून उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी स्विमिंग पूल, सिनेमागृहाचा मार्ग धरला आहे. शनिवारी देशातील बहुतेक शहरांत तापमानाचा पारा 39 अंशावर होता. वॉशिंग्टन 40.5 सेल्सियस, सेंट लुईस 41 सेल्सियस, इंडियानापोलिस 40 सेल्सियस अशी तापमानाची स्थिती होती. उष्ण वादळांची शक्यता निर्माण झाली आहे. 20 राज्यांत उष्णतेची लाट असून लुईसविले, केंटकीमध्ये 40.5 सेल्सियस, फिलाडेल्फियात 38.5 , न्यूयॉर्क 35 अशी स्थिती पाहायला मिळाली. आतापर्यंत 30 जणांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. मेरीलँडमध्ये नऊ, शिकागोमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदलामुळे काहींना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले.