आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील घटना: बॉयफ्रेंडची हायहिल्सने मारहाण करून हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन - अमेरिकेतील 44 वर्षीय महिलेने किरकोळ भांडणानंतर आपल्या बॉयफ्रेंडला हायहिल्सने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अ‍ॅना ट्रूजिलो असे महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपण हे कृत्य स्वसंरक्षणासाठी केल्याचे अ‍ॅनाचे म्हणणे आहे. या घटनेत तिच्या बॉयफ्रेंडच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

रक्तबंबाळ अवस्थेत तो मृत्यूमुखी पडला होता. या महिलेच्या सँडल्सच्या हिल्स अतिशय टोकदार असल्याने सदर व्यक्तीला जखमा झाल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण हिल्सचा आकार एखाद्या कटारीसारखा असल्याचे आढळून आले आहे. दोघांमध्ये एवढे कडाक्याचे भांडण कसे झाले , याचा तपास करण्यात येत आहे. अ‍ॅना यांची कसून चौकशी झाली आहे. दरम्यान अ‍ॅना यांची जामिनावर सुटका झाली असली तरी त्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. घटनेतील मृताचे नाव अल्फ स्टीफन अँडर्सन असून ते 59 वर्षांचे आहेत. ते ह्यूस्टन विद्यापीठात प्रोफेसर होते, अशी माहिती सांगण्यात आली आहे.