Home | International | Other Country | increasing divorce and facebook

अबब ! जगातील एक तृतीयांश घटस्फोटांमागे फेसबुक

वृत्तसंस्था | Update - Jan 01, 2012, 06:05 PM IST

'डिव्होर्स ऑनलाइन' या कायदेविषयक फर्मनुसार घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये संदर्भ म्हणून फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  • increasing divorce and facebook

    लंडन - जगभरात होणा-या घटस्फोटांपैकी एक तृतीयांश घटस्फोट हे फेसबुकमुळे होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 'डिव्होर्स ऑनलाइन' या कायदेविषयक फर्मनुसार घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये संदर्भ म्हणून फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या फर्मच्या म्हणण्यानुसार, घटस्फोटांच्या तक्रार अर्जांमध्ये फेसबुक शब्दाचा वापर गेल्या २ वर्षांत ५० टक्क्यांनी वाढलाय.
    गेल्या वर्षी फर्मकडे दाखल झालेल्या ५ हजार तक्रार अर्जांपैकी किमान ३३ टक्के अर्जांमध्ये फेसबुक वेबसाइटचा उल्लेख आहे.
    'डिव्होर्स ऑनलाइन'चे संचालक मार्क कीनन यांनी सांगितले की, ''अनेकांसाठी फेसबुक हे मित्रांशी संवाद साधण्याचे माध्यम बनले आहे. लोक अनवधानाने आपल्या जुन्या साथीदारांना संपर्क करतात. संदेश पाठवतात. यामुळे पुढे जाऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एखाद्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग हा येथेच उपलब्ध आहे.''
    फेसबुकमुळे होणा-या भांडणांपैकी बहुतेक भांडणे पती किंवा पत्नीस प्रेम संदेश आढळून आल्यानेच होतात. त्यामुळे फेसबुकवर वावरताना कोणते छायाचित्र टाकायचे, वाॅलवर काय लिहायचे, याविषयी दक्ष राहा.

Trending