आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Machine That Lays Out A Carpet Of Bricks Removing Back Breaking Hard Work

हॉलंडचा चमत्कार : आता रेडिमेड रस्त्यांनी सजणार शहरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये ग्रामपंचायत पासून लोकसभेच्या निवडणूकीत एक मुद्दा कायम असतो, तो म्हणजे रस्त्यांचा. घरातून बाहेर पडल्यावर प्रत्येकजण रस्त्यांच्या दुर्दशेविषयी बोलत असतो.

रस्ते तयार करणे हे खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे. त्यासाठी मनुष्यबळही मोठ्याप्रमाणात लागते. मात्र, आता या सर्व बाबी कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे. हॉलंडच्या एका तंत्रज्ञाने रस्ते तयार करण्याचे नवे तंत्र शोधून काढले आहे. विटा किंवा पेव्हर ब्लॉकचा रस्ता तयार करण्यासाठी आता जास्त अंगमेहनत करण्याची गरज नाही.

हॉलंडच्या हेंक वान कुईज्क यांनी स्टोन टायगर मशीनचा शोध लावला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करुन रस्ता तयार करण्याचे तंत्र यात वापरण्यात आले आहे.

हे यंत्र एका दिवसात 400 फुट रस्ता तयार करु शकते. यात केवळ विटा किंवा पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम मजुरांना करावे लागते. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या एकमेकांना जोडल्या जातात आणि पुढच्या काही क्षणात रस्ता तयार होतो.