आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैबेरियातील खड्डे..एलियन कनेक्शन, वै‍ज्ञानिक शोधत आहेत रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सैबेरियाच्या सुदूर भागात जुलै महिन्यात एक मोठा खड्डा तयार झाला आहे. यामागे एलियन किंवा उल्कपात कारणीभूत आहे का यावरुन वैज्ञानिकांमध्‍ये मतभिन्नता आहे. तरी मागील आठवड्यात रशियन संशोधकांच्या एका चमूने खड्डयाच्या 34 फुट आत उरतले. मात्र त्यांना येथे एलियन असण्‍याचे पुरावे मिळाले नाही. तसेच उल्कपात झाल्याचेही अवशेष मिळाले नाही.

आर्क्टिक एक्सप्लोरेशनच्या रशियन केंद्राचे संचालक व्लादिमीर पुशकारेवने ' द सैबेरियन टाइम्स'ला सांगितले, की माझ्या नेतृत्वाखालील गट खड्डयात उतरण्‍यात यशस्वी झाले. सर्व काही ठिक होते. आम्ही पूर्व नियोजनानुसार तपासणी आणि मोजमाप केले. मिळवलेल्या डेटाच्या विश्‍लेषणानंतरच आपल्याला त्या घटनेचे गूढ कळेल, असे पुशकारेव यांनी वृत्तपत्राला सांगितले.

खड्ड्यामागील रहस्य काय?
जमीनच्या खाली असणारे बर्फ वितळल्याने संबंधित जागा खाली झाली आणि गॅसच्या उच्च दाबाच्या विस्फोट होऊन हा खड्डा तयार झाला, असे पुशकारेव यांनी सांगितले.

'घाबरने आवश्‍यक नाही'
खड्ड्यापासून कोणताही धोका नाही. तसेच घाबरु नये, असे पुशकारेव यांनी स्पष्‍ट केले.

जगाचा अंत
हा खड्डा सैबेरियाच्या यमालो-नेनस्की भागातील सेलेखर्द जवळ मोठे वायूक्षेत्र आहे. ते रशियाची राजधानी मॉस्कोपासून 2 हजार किमी दूर आहे. हा तर जगाचा अंत तर नाहीना असा प्रश्‍न स्थान‍िकांनी उपस्थित केले आहे.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा खड्ड्याचे आतील छायाचित्रे...