Home | International | China | india- china, army officer gets once again chinese visa, international

भारतीय लष्कर अधिकाऱयांना व्हिसा नाकारणाऱया चीनचे एक पाऊल मागे

agency | Update - Jun 17, 2011, 12:11 PM IST

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱयांना चीनचा व्हिसा देण्यास नकार देणाऱया चीनने आता तो व्हिसा देण्यास परत सुरवात केली आहे.

  • india- china, army officer gets once again chinese visa, international

    india_256_03नवी दिल्ली- भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱयांना चीनचा व्हिसा देण्यास नकार देणाऱया चीनने आता तो व्हिसा देण्यास परत सुरवात केली आहे. प्रथम व्हिसा नकारणाऱया आता देणाऱया चीनने याबाबत एक पाऊल मागे गेतल्याचे दिसून येत आहे. यानंतर भारतानेही चीनशी एक वर्षासाठी संरक्षण विषयक मदत करण्यास तयार केली आहे. येत्या रविवारी जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेले मेजर जनरल रॅंकमधील एका वरिष्ठ अधिकाऱयांच्या नेतृत्त्वाखाली चीनचा दौरा करणार आहेत.
    पंतप्रधान यांनी चीनचा एप्रिलमध्ये दौरा केला होता. त्यावेळी मेजर जनरल यांना सहा दिवसाच्या चीन दौऱयावर पाठविण्याचा निर्णय झाला होता. लष्करातील अधिकाऱयांनी सांगितले की, या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व डेल्टा फोर्सचे मेजर जनरल गुरमीत सिंह करतील.
    डेल्टा फोर्स हे नक्षलवाद्याचा प्रभाव असलेल्या भागात म्हणजे डोडा, किश्तवाड, रामबन या भागात तैनात आहे. या दौऱयादरम्यान भारत-चीन या दोन देशाच्या जवानांमध्ये सुसंवादाची अपेक्षा ठेवली जात आहे. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लेफ्टनंट जनरल बी.एस. जसवाल यांना चीनने व्हिसा देण्यास नकार दिला होता.Trending