आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Accounts For One Third Of The World Poor: World Bank

जगात एक तृतीयांश गरीब राहतात भारतात !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जगातील एक तृतीयांश गरीब नागरिक भारतात आहेत. गरीब नागरिक दररोज 1.25 डॉलरपेक्षा (जवळपास 65 रुपये) कमी पैशावर गुजराण करत आहेत. जागतिक बॅँकेच्या ताज्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

‘गरिबांची स्थिती : कोठे आहेत गरीब, कोठे आहेत अतिगरीब’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगातील 120 कोटी नागरिक खूप गरिबीत आयुष्य जगत आहेत. मात्र, प्रत्येक विकसनशील देशात गरिबी कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 1981 ते 2010 दरम्यान हे प्रमाण 50 टक्क्यांहून कमी होऊन 21 टक्के झाले आहे. कमी विकसनशील देशांची लोकसंख्या 59 टक्क्यांनी वाढल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सहारा आफ्रिका देशांत जगातील एक तृतीयांश अधिक गरीब आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत तेथील स्थितीत चांगली सुधारणा झाली आहे.

2030 मध्ये खूप गरिबीची अवस्था संपुष्टात
जागतिक बॅँक समूहाचे अध्यक्ष जिम योंग किम म्हणाले, एवढ्या संख्येत गरीब लोक असणे आपल्या सामाजिक जाणिवेवरील कलंक आहे. मात्र, आमचे विश्लेषण आणि आमचा सल्ला स्वीकारला गेल्यास 2030 पर्यंत जगातील खूप गरीब लोकांची अवस्था संपुष्टात येऊ शकते. जागतिक बॅँकेचे उपाध्यक्ष कौशिक बसू म्हणाले, आम्ही गरिबी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र ते पुरसे नाही. जागतिक लोकसंख्येचा पाचवा भाग अद्याप दारिद्र्यरेषेच्या खाली आहे.