आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India And Pakistan May Fight Proxy War Musharaff

अफगाणिस्तानमधून नाटो सैन्य गेल्यास भारत आणि पाकमध्‍ये छुपे युध्‍द - मुशर्रफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - नाटो सैन्यांने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यास भारत आणि पाकिस्तानमध्‍ये छुपे युध्‍द होतील, असे पाकिस्तानचे माजी लष्‍कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी सांगितले. मुशर्रफ यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे.
पाक‍िस्तानचा शासनकर्ता म्हणून मुशर्रफ हे दहशतवादीविरोधी मोहिमेत अमेरिकेचे महत्त्वाचे मित्र राष्‍ट्र होते. परंतु सध्‍या ते कराचीत आपल्याच घरात कडक सुरक्षेखाली राहत आहेत. त्यांच्या जीवाला तालिबानचा धोका आहे. अफगाणिस्तानमधील भारतीय प्रभाव हा पाकिस्तानसाठी धोकादायक आहे, असे मुशर्रफ यांनी एएफपीला सांगितले. भारताचा सहभाग पूर्ण भाग आणि पाकिस्तानसाठी बरोबर नाही. त्यांना पाकिस्तान विरोधी अफगाणिस्तान तयार करायचा आहे.