आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Australia Drop 3600 Robot In Hindi Ocean For Study

हिंदी महासागरातील बदलांच्या अभ्‍यासासाठी भारत-ऑस्ट्रेलिया समुद्रात 3600 रोबो सोडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबरा - हिंदी महासागरातील बदल आणि वातावरणावर आता रोबो देखरेख करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने यासाठी संयुक्त संशोधन प्रोजेक्ट स्थापन केला आहे. याअंतर्गत समुद्रामधील उष्ण वायू आणि त्याचा परिणाम जाणून घेतला जाईल. त्यासाठी नवी रोबोटिक सामग्री बायो ऑर्गो सोडण्यात येईल. यातून सागरात होणारे बदल टिपले जातील. नवा बायो ऑर्गो रोबोसाठा या वर्षी सोडण्यात येतील.


बायो ऑर्गो रोबो
नव्या साठ्यामध्ये 3600 ऑर्गो रोबो असतील. सागरी तापमान आणि क्षारतेचे अचूक आकडेवारी मिळेल. हिंदी महासागरात काही रोबो आधीपासून आहेत. सध्या ते केवळ रासायनिक व जैविक बदलांची माहिती गोळा करत आहेत.


अचूक माहिती मिळणार
बायो ऑर्गो साठ्यामधील नवे सेन्सर्स पाण्यातील ऑक्सिजन, तापमान, नायट्रेट क्लोरोफिलव्यतिरिक्त कार्बनिक तत्त्वांची अचूक माहिती दिली जाईल. हिंदी महासागराच्या जलवायूची सद्य:स्थितीतील माहिती मिळेल. महासागराची पाणी पातळी वाढणे किंवा घटण्याची योग्य आकडेवारी कळेल.


योजनेचा उपयोग
हिंदी महासागराच्या आसपास जगातील 16 टक्के लोकसंख्या राहते. रोबो कोरल रीफ व माशांच्या प्रजातीतील बदलाची माहिती देईल. पृष्ठभागाखाली होणारे बदल समजतील. महासागरामुळे माणसाच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो, हे यातून कळेल.