आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Australia Nuclear Deal News In Marathi, Australian Broadcasting Corporation

भारत ऑस्ट्रेलियाशी करणार अणुकरार, पुढील महिन्यात होणार स्वाक्षरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया नागरी अणू सहकार्यावर सहमत झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यासाठी प्रयत्न सुरू होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉट पुढील महिन्यात भारत दौ-यावर येत आहेत. या वेळी करारावर स्वाक्षरी होणार आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

भारतीय अधिका-यांनी ऑस्ट्रेलियाकडून मिळणा-या युरेनियमचा वापर शस्त्रनिर्मितीसाठी केला जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी करारासाठी सहमती दर्शवली. भारताने करारासाठी अन्य अणुपुरवठादार देशांपेक्षा खूप कमी अवधी घेतला आहे.

लेबर पार्टीने 2012 मध्ये भारताच्या युरेनियम निर्यातीवर बंदीचा निर्णय मागे घेतला होता. यानंतर दोन्ही देशांनी करारासाठी चर्चा सुरू केली होती. ऑस्ट्रेलियाजवळ जगातील युरेनियम स्रोताचा एक तृतीयांश साठा आहे. ते दरवर्षी 7 हजार टन युरेनियम निर्यात करतात.