Home | International | China | india-china, embassy meet, international

चांगले कर्म करणाऱयांचा भारतात पुनर्जन्म होईल- माओ

agency | Update - Jun 18, 2011, 08:44 PM IST

माओत्से तुंगने चीनच्या म्हणीचा दाखला देत म्हटले होते की, जर कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यात चांगले काम व कर्म करेल त्याचा पुनर्जन्म भारत देशात होईल.

 • india-china, embassy meet, international

  mao_256बीजिंग- चीनमधील साम्यवादी पक्षाचा संस्थापक माओत्से तुंग याने एका जुन्या चीनच्या म्हणीचा दाखला देत म्हटले होते की, जर कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यात चांगले काम व कर्म करेल त्याचा पुनर्जन्म भारत देशात होईल.
  माओ याच्या लाल पुस्तकातील म्हणी जगभर प्रसिध्द आहेत. त्याचे दाखले बोलण्यातून मिळतात. त्याने भारताबाबत केलेल्या वाक्याबाबत मात्र कोणी फार बोलले नाही. मात्र चीनमधील भारतीय राजदूत एस. जयशंकर यांनी शनिवारी याबाबत भाष्य केले.
  माओने १९५० साली भारताचे पहिले राजदूत एम. पणिक्कर यांच्याबरोबर संवाद साधला होता. त्यावेळी माओने वरील म्हणीबाबत वक्तव्य केले होते. त्याचे म्हणणे हेच सांगते की, चीन भारताकडे किती चांगल्या नजरेने पाहतो.

  सांस्कृतिकदृष्ट्या दोन्ही देश एकच-
  आशियातील इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात भारत आणि चीन यांच्या संदर्भातील इतिहासाचा आढावा घेण्यात आला. या चर्चासत्राचे आयोजन दोन्ही देशांनी मिळून केले होते. जयशंकर म्हणाले, सत्य हे आहे की, भारत आणि चीन हे अनेक शतकापासून एकमेंकाशी जोडले गेले आहेत. त्याचा उल्लेख तत्कालीन अध्यक्ष माओ यांनीही वेळोवेळी केला होता. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही देशांत झालेल्या चढउताराच्या संबंधांमुळे लोकांच्या डोक्यातून दोन देशातील सांस्कृतिक जवळीक नष्ट होत गेली असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.Trending