अहमदाबाद - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी गुजरातला चीनकडून तीन भेटी मिळाल्या. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग बुधवारी तीनदिवसीय दौऱ्यानिमित्त अहमदाबादला पोहोचले. तीनच तासांत चीन आिण गुजरात सरकारमध्ये तीन करार झाले.
सायंकाळी िजनपिंग यांनी साबरमती आश्रमाला भेट देत चरखाही चालवून पाहिला. यानंतर ते मोदी यांच्यासह साबरमती रिव्हर फ्रंटवर गेले. नदीतीरीच चिनी अध्यक्षांना भव्य मेजवानी देण्यात आली. एखाद्या विदेशी राष्ट्राध्यक्षाने गुजरातमधून दौऱ्याचा प्रारंभ करण्याची घटना पहिल्यांदाच घडली अाहे. गुरुवारी दिल्लीत मोदी आणि जिनपिंग यांच्यात औपचारिक चर्चा होऊन अनेक करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहेत.
फायदा गुजरातलाच
१. अहमदाबाद आता चीनच्या सर्वात विकसित शहरांपैकी एक ग्वांगझूच्या धरतीवर विकसित होणार आहे.
२. ग्वांगझूच्या सांस्कृतिक व आिर्थक िवकासाच्या धर्तीवर गुजरातचा विकास.
३. जीआयडीसी व चायना डेव्हलपमेंट बँकेच्या करारान्वये बडोद्याजवळ औद्योगिक पार्क विकसित होणार.