आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India, China To Order 100 Naval Ships Each By 2032

सागरी सामर्थ्य वाढीसाठी भारत-चीनमध्ये चुरस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - जागतिक सुरक्षाविषयक बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनने सागरी संरक्षण आणि सागरी व्यापाराच्या बळकटीला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन्ही देशांनी प्रत्येकी 100 जहाजांची मागणी नोंदवली आहे.

अमेरिकेतील नौदलविषयक कन्सल्टन्सीने उभय देशांनी अशी ऑर्डर दिल्याचा दावा केला आहे. या मागणीत अणुविषयक आणि तटरक्षक विमानवाहू नौकांचाही समावेश आहे.

लहान-मोठ्या विनाशिका, युद्धनौकांचाही समावेश या ऑर्डरमध्ये असल्याचे एएमआयचे उपाध्यक्ष बॉब नॉजेंट यांनी सांगितले. प्रदेशातून आलेली ही ऑर्डर खूप मोठी आहे. जहाज तयार करून दिल्यानंतर त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता असलेला आशिया हा अमेरिकेनंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा प्रदेश ठरणार आहे. व्यापार आणि विश्वास वृद्धीसाठी सागरी व्यापार-संबंधाला चालना देण्यावर भारत-चीन यांच्यात सहमती झाली आहे. जहाज खरेदीमुळे व्यापार संबंधही दृढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास उभय देशांना वाटतो.

दरम्यान, या आठवड्यात जगभरातील 15 युद्धनौकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यात भारताच्या आयएनएस सातपुडा, शिवालिक यांचाही समावेश आहे.

20 वर्षांत पूर्तता : आशिया-प्रशांत प्रदेशातून ही ऑर्डर आली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आणखी वीस वर्षे लागणार आहेत. हा सौदा सुमारे 200 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा आहे.

सागरी सुरक्षेवर लक्ष : दोन्ही देशांनी दिलेल्या ऑर्डरचा परिणाम म्हणून प्रदेशातून पहिल्यांदाच सागरी सुरक्षेवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी 20 वर्षांत एवढ्या जहाजांची मागणी अजून तरी कोणत्याही प्रदेशातून आलेली नाही.

अमेरिकेची मागणी किती?
2012 ते 2013 या काळात अमेरिकेने नौदल जहाजांची मागणी नोंदवली आहे. जगातील एकूण मागणीपैकी हा 14 टक्के एवढा भाग आहे. 453 जहाजांची अमेरिकेकडून मागणी करण्यात आली आहे.

आणखी कोणते देश ?
आगामी वीस वर्षांत सागरी सुरक्षेसाठी जहाजांच्या खरेदीची ऑर्डर देणार्‍या देशांमध्ये दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया यांचाही समावेश आहे. त्यांचा एकूण सौदा 62 अब्ज डॉलर्सच्या घरात जातो.