आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या सहकार्याने जाफना-कोलंबो जोडले, क्वीन ऑफ जाफना धावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाफना/कोलंबो - उत्तर श्रीलंकेतील जाफना शहराला राजधानी कोलंबोशी जोडणारी ‘क्वीन ऑफ जाफना’ ही रेल्वे २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे सोमवारी कोलंबोमध्ये ४०० किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचे उद्घाटन करतील. तामीळ गृहयुद्ध संपल्यानंतर पाच वर्षांनी भारताच्या मदतीने ही सेवा सुरू केली जात आहे. या पुनर्निर्माण कार्यासाठी भारताने ४८९९ कोटी (८०० मिलियन डॉलर) रुपयांचे कर्ज दिले आहे.

खूप सा-या अपेक्षा
जाफना येथील ५० वर्षीय आर. थियागराज सांगतात, देशातील अनेक युवकांना ही रेल्वे कशी दिसते हेच माहीत नाही. या रेल्वेमुळे जाफनाच्या पर्यटन आणि वाहतूक व्यवसायाला चालना मिळेल.

यामुळे बंद होती रेल्वे
जाफनाचे सैनिक या रेल्वेने आपल्या घरी जायचे म्हणून लिबरेशन टायगर ऑफ तमीळ इलमचे (लिट्टे) सदस्य या रेल्वेवर हल्ला चढवायचे. जानेवारी १९८५ मध्ये लिट्टे समर्थकांनी या रेल्वेवर हल्ला केला. त्यात २२ सैनिक तसेच ११ नागरिकांचा मृत्यू आणि ४४ पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. श्रीलंकन सैन्यावर लिट्टेकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ५ वर्षांनंतर १९९० मध्ये क्वीन ऑफ जाफना बंद करण्यात आली. २५ वर्षांपर्यंत चाललेल्या या श्रीलंकन गृहयुद्धात दोन्हीकडील सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोक मारले गेली.

‘क्वीन ऑफ जाफना’ची शाही सवारी
नव्या क्वीन ऑफ जाफनाचे रुपडे जुन्या पद्धतीनुसारच आहे. गाडीचे अनेक डबे वातानुकूलित आहेत. त्यात इंटरनेट आणि टीव्हीची सुविधा आहे. नवीन रेल्वेमार्ग अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित आहे. ४०० किमीचे अंतर ही गाडी ६ तासांत पूर्ण करेल.