कराची (पाकिस्तान)- बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा सहभाग होता. त्यामुळे आम्ही जशास तसे उत्तर देण्यासाठी कारगिल घडवून आणले, असे वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानचे माजी हुकूमशहा आणि कारगिल युद्धाच्या वेळी लष्कर प्रमुख असलेले परवेझ मुशर्रफ यांनी आज (बुधवार) केले.
बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्त्वपूर्ण सहभाग होता आणि सियाचिन ताब्यात घेण्याचा भारताने प्रयत्न केला होता, असा आरोप 71 वर्षीय पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाचे मास्टरमाईंड परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे.
'समा' या वृत्तवाहिनीसोबत बोलताना मुशर्रफ म्हणाले, की त्यांनी बांगलादेश केला म्हणून आम्ही कारगिल केले. प्रत्येक विषयावर जशास तसे धोरण अवलंबिण्याच्या बाजूचा मी आहे. भारतासोबत मैत्री तेव्हाच होऊ शकते जेव्हा दोन्ही देश एकमेकांचा आदर करतील, एकमेकांना समान दर्जा देतील. मैत्रीसाठी भारताने एक पाऊल पुढे घेतले तर आमची दोन पावले पुढे येण्याची तयारी आहे.
मुशर्रफ म्हणाले, की लोकांना वाटते, की मला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध नको. पण तसे मुळीच नाही. माझ्या कार्यकाळात भारतासोबत चांगले संबंध राहिले आहेत. काश्मिर, सर क्रिक आणि पाणी करारासारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करुन तोडगा काढण्याच्या आम्ही अगदी जवळ होतो.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी सरकारसोबतही मैत्रीपूर्ण संबंध होऊ शकतात. पण आम्ही भारतासमोर झुकणार नाही किंवा त्यांच्या अटींवर चर्चा करणार नाही. भारताची आक्रामता कायम राहिली तर पाकिस्ताननेही त्याच भाषेत उत्तर द्यायला हवे, असेही मुशर्रफ यांनी सांगितले.
परवेझ मुशर्रफ यांनी का केले असे वादग्रस्त वक्तव्य वाचा पुढील स्लाईडवर....