आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपहरण झालेल्या 40 मजुरांचे ठिकाण समजले, परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इराकमध्ये अकडलेल्या 40 भारतीयांचा पत्ता लागल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ते कोणत्या ठिकाणी आहेत, याबाबतही माहिती मिळाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले आहे. शक्य त्या सर्व ससंस्थांशी संपर्क करून या भारतीयांना परत देशात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्वराज यांनी सांगितले आहे. दरम्यान, या सर्व मजुरांचे आयएसआयएसने अपहरण केल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप त्यांनी कोणताही संपर्क केला नसल्याचे स्वराज म्हणाल्या.

3 हजार भारतीय युवक इराकला जाण्यास तयार
इराकमध्ये दहशतवाद्यांनी घातलेल्या हैदोसामध्ये प्रामुख्याने शिया पंथीय मुस्लीमांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे भारतातील 3 हजार शिया तरुणांना या शिया बांधवांच्या मदतीसाठी इराकला जाण्याची तयारी दाखवली आहे. याठिकाणी ते मदत आणि बचावकार्यात मदत करण्यास तयार आहेत. विशेष म्हणझे वेळप्रसंगी शिया बांधवांच्या मदतीसाठी आयएसआयएसच्या विरोधात शस्त्र हाती घेण्याची तयारीही या तरुणांनी दाखवली आहे.
कोणाची तरी बाजू घ्यावी लागेल-स्वामी
या प्रकरणी भाजप नेते सुब्रमण्यम स्‍वामी यांनी भारताला शिया किंवा सुन्नी यांच्यांपैकी एकाची बाजू घ्यावी लागणार अशल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे युद्ध संपूर्ण जगातील शिया विरुद्ध सुन्नी असे रूप धारण करत आहे. त्यामुळे आपल्याचा कोणाला तरी पाठिंबा द्यावा लागेल असे ते म्हणाले. शिया पंथीयांची वागणूक हिंदुंप्रती मित्रत्वाची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपने चूक केली
स्वामी म्हणाले, 'पाकिस्‍तान श्रीलंकेच्या तमिळ मुस्लीमांना प्रशिक्षण देत आहे. हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. आपल्याला श्रीलंकेबरोबर संबंध दृढ करावे लागतील. आमच्या पक्षाने तामिळनाडूमध्ये आघाडी करून चूक केली. हे सर्व लिट्टेंचे समर्थक आहेत.

पुढे पाहा - दहशतवाद्यांविरोधात शस्त्र उचलण्यासाठी इराकचे नागरिक सरसावले आहेत. त्यांना सैन्याच्यावतीने प्रशिक्षण दिले जात आहे. त्याची छायाचित्रे पाहा पुढील स्लाइडवर