आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला मिळाले पहिले अँम्ब्रेअर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ पाओलो- संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित अँम्ब्रेअर 145 हे आगाऊ इशारा आणि नियंत्रण प्रणालीने (एईडब्ल्यू अँड सी) सज्ज असलेले पहिले विमान शुक्रवारी भारताला मिळाल्याने आकाशामध्ये इलेक्ट्रॉनिक डोळ्याने निगराणी ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या विमानावर अँक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड अँरे (एईएसए) ही भारताने विकसित केलेली रडार प्रणाली बसवण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी कुठेही लपून बसलेला शत्रू आणि त्याच्या क्षेपणास्त्रांचा शोध घेण्याची क्षमता या रडार प्रणालीमध्ये आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अशी तीन विमाने तैनात केली जाणार असून त्यापैकी पहिले विमान शुक्रवारी मिळाले. अँम्ब्रेअरच्या ब्राझीलमधील साओ पाओलो येथील मुख्यालयात उच्चपदस्थ भारतीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हे विमान भारताकडे हस्तांतरित करण्यात आले.
210 दशलक्ष डॉलर किमतीच्या तीन अँम्ब्रेअर विमानांचा पुरवठा करण्याचा करार भारत आणि ब्राझीलमध्ये झाला होता. अमेरिकेच्या बोइंग आणि युरोपच्या एअर बसनंतर अँम्ब्रेअर ही जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी विमान उत्पादक कंपनी आहे.
डीआरडीओच्या संयुक्त विद्यमाने किचकट यंत्रणा असलेले विमान विकसित करण्यात आल्यामुळे ब्राझील आणि भारताचे संबंध आणखी दृढ झाले असल्याचे अँम्ब्रेअर डिफेन्स अँड सेक्युरिटी कंपनीचे अध्यक्ष कालरेस अग्युअर यांनी म्हटले आहे.