नवी दिल्ली - आशियाचा विचार केला तर भारतात सर्वात कमी इंटरनेट स्पिड असल्याची माहिती पुढे आली आहे. स्टेट ऑफ इंटरनेट रिपोर्ट अंतर्गत प्रसिध्द अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. नेटवर्क अकामाईने हा अहवाल प्रसिध्द केला आहे.
भारतामध्ये इंटरनेट स्पीड 1.7 एमबीपीएस इतकी आहे. या तुलनेत थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाइन्स आणि व्हिएतनाम या देशात इंटरनेट स्पिड अधिक आहे. इंटरनेट स्पिडच्या संदर्भात भारताचा जगात 118 क्रमांकावर आहे.
भारतात प्रत्येक पंधरवाड्यात इंटरनेट गती 8.4 टक्क्यांनी वाढत आहे. याचा वार्षिक वृध्दीदर 24 टक्के इतका आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवर हीच गती 3.9 एमबीपीएस इतकी आहे. भारतात इंटरनेट कनेक्शन गती 12 एमबीपीएस इतकी आहे.
पुढे वाचा.... जगातील बहुतेक संकेतस्थळांचा रंग आहे निळा....