आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान महिन्‍यात पेप्‍सी प्यायल्यामुळे कुवेतमध्‍ये भारतीयाची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमजान महिन्‍यात पेप्‍सी प्‍यायल्‍यामुळे शब्बू नावाच्‍या मजुराची हत्‍या करण्‍यात आली व मृतदेह झाडाला टांगण्‍यात आला. तीन दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हत्या करण्‍यात आलेला युवक राजस्‍थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील मोर या गावातील आहे.
शब्बू कामानिमित्त जुलै महिन्‍यात कुवेत मध्‍ये गेला. मजुरीसाठी गेलेल्‍या शब्बूला रमजान महिना चालू झाल्‍याची माहिती नव्‍हती. पेप्‍सी घेत असताना इतर मजुरांनी त्‍याला पाहिले आणि रमजान सुरु असताना तु पेप्‍सी का प्यायलास म्हणून त्याची हत्या करण्‍यात आली. या घटनेची माहिती हिरालाल या मजुराने दिली आहे.
पोलिसांना शब्‍बुचा मृतदेह कुवेतच्‍या जलेबीसुख परिसरामध्‍ये झाडाला लटकलेला आढळून आला. कानातील बाळी आणि हातातील कड्यामुळे शब्बुची ओळख पटली असे सांगण्‍यात आले. मंगळवारी शब्बुचा मृतदेह भारतात आणण्‍यात आला. मोर या गावचे 400 लोक कुवेतमध्‍ये मजुरी करत आहेत. ही घटना घडल्‍यानंतर 10 ते 12 लोक काम सोडून मोरला परतले आहेत.