नवी दिल्ली - भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एका ऐतिहासिक यशाला गवसणी घातली आहे. सुमारे 65 कोटी किलोमीटर अंतरावर पाठवण्यात आलेले मंगळयान, मंगळाच्या कक्षेत स्थिरावले आहे. भारताच्या या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाबरोबरच देशभरातील माध्यमांनीही इस्रोवर स्तुतिसुमने उधळली आहेत. अमेरिकेतून प्रकाशित होणा-या वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रात इतक्या कमी खर्चात मंगळग्रहावर यान पाठवून भारताने कमाल केली असल्याचे म्हटले आहे.
'द टेलीग्राफ' (ब्रिटेन)
एवढ्या कमी खर्चात मोहीम राबवणे हे खरंच स्तुत्य आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इस्रोने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. जगातील इतर संस्थांना मात्र पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्यात यश आलेले नाही. मार्स ऑर्बिटर मिशन 'MOM' च्या यशानंतर भारत अमेरिका, यूरोपियन स्पेस एजंसी आणि पूर्व सोव्हीयत युनियनच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
पुढे वाचा : भारत आणि इस्रोच्या यशावर परदेशी माध्यमांची मते