आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवेअर वेबसाइट्समध्ये भारत दुसरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगभरात मालवेअर वेबसाइट्सचा धोका असलेल्या देशात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. गुगलने जारी केलेल्या एका अहवालानुसार या धोकादायक ठिकाणांच्या यादीत हंगेरी पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. अशा प्रकारची सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर नियंत्रण मिळवतात. गुगलच्या नव्या सेवेअंतर्गत हंगेरीत स्कॅन केलेल्या 64,175 वेबसाइट्सपैकी 15 टक्के वेबसाइट्स तर भारतात स्कॅन केलेल्या 25,935 वेबसाइट्सपैकी 14 टक्के वेबसाइट्स मालवेअर असल्याचे आढळले. संगणकावरून माहिती चोरण्यासाठी अशी सॉफ्टवेअर तयार केली जातात.